Monday 9 August 2010

Vada Pav.


This is most fabulous maharashtriyan snack..and mumbai's best junk food.



उकडलेले बटाटे - ६एक
कोथिंबीर-खूप
कढीपत्ता-८एक पाने
लसूण-६ पाकळ्या
आले-१/२ इंच
हिरवी मिरची ४- पेस्ट करून
तेल-१ पळी
जिरे-मोहरी
हळद
मिठ
तिखट-१/४ चमचा
बेसन
कृती

१.कढईत तेल घालून जिरे,मोहरी,हिरवी मिरची,कधिपत्ता,लसूण,आले एक एक शीजले की क्रमवार घाला.
मग हळद घाला.मग उकडलेले, मश केलेले बटाटे घाला. मिठ घाला. ४ मिनिट वाफ काढा.
कोथिंबीर घालून मिक्स करा. व भाजी गार होऊ द्या.

२.वड्या वरील आवरणा साठी बेसन,मीठ,लाल तिखट एकत्र करा. त्यात पाणी घालून घत्तसर मिश्रण बनवा. जास्त पातळ मिश्रण असेल तर ते वड्या ला मिश्रण नीट लागणार नाही. व वडा देखील कढाईला चिकटेल.

३.कढईत तेल तापवा. आता बनवलेल्या भाजीचे गोल गोल गोळे बनवा. मग ते क्र.२ च्या मिश्रणात बुडवा. व तापलेल्या तेलात फ्राइ करा.

वडे तयार आहेत..

No comments:

Post a Comment