Wednesday 23 February 2011

सुकटची चटणी /suktichi chatni

सुकटची चटणी / sukat chi chatni



जिन्नस
सुकट २ वाटि
टोमेटो-१
कान्दा-१
लसुण-४ पाकळ्या
हिरवि मिर्चि-१
कोथिम्बिर चिरुन
तिखट-१ चमचा
हळ्द-१ लहान चमचा
मिठ- चविनुसार
तेल- १ पळि
जिरे- १ लहान चमचा



मार्गदर्शन

१.एका पातेल्यात पाणी घ्यावे. मग त्यात सुकट टाकावी. सुकट पाण्यात अलगद तरंगेल. ति पाण्यातून काढून घ्यावी.
२.एका कढईत तेल घ्यावे.त्यात जिरे,ठेचलेला लसूण व कांदा सोनेरी होई पर्यंत परतावा. त्यात चिरलेला टोमेटो टाकावा .त्यात हळद, तिखट व मीठ टाकावे.
३.नंतर धुऊन घेतलेली सुकट टाकावी. व वाफ येईपर्यंत शिजवावी. ही चटणी सुकी बनते. वरुन कोथिंबीर टाकून सर्व करावी. हि सुकटिची चटणी तांदुळाच्या भाकरीबरोबर खुप मस्त लागते.

टीपा
सुकट पाण्यात टाकण्याचे कारण - त्यात कधी कधी माती असते

1132 वाचने.

Tuesday 22 February 2011

मस्त मस्त कुकिज/cookies recipe

मस्त मस्त कुकिज/cookies





१ कप गव्हाचे पिठ
1/4 कप self raising फ्लोर
1/2 कप पिठि साखर
1/4 टिस्पुन मिठ
1/2 टिस्पुन इलायची
1/2 कप अनसॉल्टेड बटर
2 टेबल्स्पून्स दुध

ओवेन 360 डिग्री फॅरनाइट वर प्री हिट करा.
एका बोल मधे पीठ, साखर,मिठ,इलायची पाउडर मिक्स करा.
आता वितल्लेले बटर,दूध घालुन निट मिक्स करा व ते वरिल बोल मधिल मिक्स मधे घाला.
ह्याचा मळून मउ गोळा करा. आनी त्याचे छोटे छोटे गोळे करून चप्टे करा.
आता हे गोळे बेकिंग ट्रे वर ठेवा. व १५ मिनिट साठि बेक करा.
आता ह्या कुकिस तयार झाल्या.

गरम गरम चहा बरोबर मस्त लागतात

चिकन तिक्खा कबाब

चिकन तिक्खा कबाब /chicken kabab





चिकन पीसेस ना खूप सारे तिखट मीठ लिंबू रस लावा. किमान ४ तास फ्रिज मुरत ठेवा. वाट बघायची तयारी असेल तर रात्रभर हे चिकन फ्रिड्ज मधे ठेवा.

आता हे चिकन फ्रिड्ज मधून काढा. एका वेगळ्या भांड्यात दही,वितलेले बटर किंवा मोहोरीचे तेल घाला. मग त्यात थोडा रंग व चिकन मसाला घाला. थोडे अजुन मीठ घाला.[आधीच चिकेनला मीठ लावले आहे विसरू नका..नाहीतर खारट होतील कबाब.]

ओवेन प्री हिट करावा. आणि त्यात हे चिकेन कबाब २०-२५ मिनिट भाजून काढावेत. आणि ईव्निंग स्नॅक म्हणून खावे

idli sambar



साहित्य :-
2 वाट्या तांदूळ, 1 वाटी उडीद्डाळ,(दोन्ही रात्रभर भिजत घालावे, सकाळी मिक्सरमधून वाटून ठेवावे.)
साधारण सहा-सात तासात ईडली पीठ तयार होते.)

-ईडली पिठात थोडेसे मीठ घालून, ईडलीपात्रातून ईडल्या करुन घ्याव्यात

Sambar/सांबर

२ वाटी तूर डाळ धुवून त्यात पाणी व हळद व एक चमचा तेल घाला. व कुकरला शिट्या लावा . डाळ शीजली की घोटून घ्या.

तेल गरम करून त्यात मोहोरी जिरे लसूण,चिरलेला कांदा,कढीपत्ता,लाल सुकी मिरची,चिरलेला �¤
�ोमॅटो घाला व शिजवा. मग त्यात घोटलेली डाळ घाला. चिंचेचा कोळ, गुळ व मीठ घाला. व सांबार मसाला घालून उकळी येऊ द्या. मग त्यात चिरलेली कोथिंबीर घाला.
[आवडीनुसार वांगी,शेवगाची शेन्ग घालू शकता.]

khandeshi chicken/tandulachi bhakri




चिकन-५००ग्रॅम
दहि
हळद
लाल तिखट-२ चमचे
मीठ
तेल
चिकन मसाला
टोमॅटो-१ चिरुन

khandeshi chicken, ani tandulachi bhakri [Rice floor bread]

वाटण साहित्य

सुके खोबरे - अरधी वाटी
कांदे- ४
लसूण-२० पाकळ्या
आले
हिरवी मिरची-७-८
जिरे
कोथिंबीर.



चिकन ला १चमचा दही लावून मुरत ठेवावे.

खोबर्‍याचे काप तव्यावर भाजून घ्यावेत. थोडे तेल तव्यावर टाकून कांदे चांगले तपकिरी होई पर्यंत भाजा.मिक्सर मधे खोबरे,कांदे आणि वाटना चे बाकीचे साहित्य थोडे पाणी घालून वाटून घ्यावे.
कढईत तेल टाकून त्यात वरील वाटण टाकावे. थोडे फ्राइ झाल मग त्यात हळद, मिठ, लाल तिखट,चिकन मसाला टाकावा.




मसाल्याचा एक सुगंध येऊ लागेल मग टोमॅटो टाकावेत आणि फ्राइ करावे मग त्यात चिकन टाकावे. आणि चिकन पूर्ण शीजल्यावर भाकरी सोबत सर्व करावे..